पाणलोटात पावसाची विश्रांती; मुळा धरणात ४४ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 17:06 IST2020-07-31T17:05:59+5:302020-07-31T17:06:37+5:30
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात शुक्रवारी ४४ टक्के पाणी साठ्याची नोंद झाली. पाण्याचा साठा ११ हजार ३८० दशलक्ष घनफूट झाला आहे.

पाणलोटात पावसाची विश्रांती; मुळा धरणात ४४ टक्के पाणीसाठा
राहुरी : २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात शुक्रवारी ४४ टक्के पाणी साठ्याची नोंद झाली. पाण्याचा साठा ११ हजार ३८० दशलक्ष घनफूट झाला आहे.
ँमुळा धरणाकडे कोतूळहून ८८६ पाण्याची आवक सुरू आहे. शुक्रवारी(३१ जुलै) पावसाने पाणलोट क्षेत्रावर विश्रांती घेतली आहे. धरणाची पातळी १७७९.४५ फूट इतकी झाली आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा ६८८६ दशलक्ष घनफूट(३२.०२ टक्के) इतका आहे.
मुळानगर येथे १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात कोतूळ येथे ३४४ मिलिमीटर तर मुळानगर येथे ५९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. मुळा धरणाचे दोन्ही कालवे बंद आहेत.
मुळा धरणात २८४ दशलक्ष घनफूट नवीन पाणीसाठाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ४१७१ दशलक्ष घनफूट पाणी धरणात नव्याने आले आहे. मात्र लाभक्षेत्रावर पावसाने सरासरी ओलांडली आहे.