रुईचोंडा धबधब्यात पडलेला रेल्वे पोलीस पाणबुडीने सुद्धा सापडेना; तिस-या दिवशी शोध मोहीम थांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:23 IST2020-09-26T17:22:15+5:302020-09-26T17:23:20+5:30
पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाखालील रुईचोंडा धबधब्यात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन मित्रांबरोबर गेलेले रेल्वे पोलीस गणेश दहिफळे हे पाण्याच्या भोव-यात सापडून डोहामध्ये अडकले होते. तीन दिवसापासून त्यांचा शोध घेतला तरी ते अद्याप सापडले नाहीत.

रुईचोंडा धबधब्यात पडलेला रेल्वे पोलीस पाणबुडीने सुद्धा सापडेना; तिस-या दिवशी शोध मोहीम थांबविली
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाखालील रुईचोंडा धबधब्यात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन मित्रांबरोबर गेलेले रेल्वे पोलीस गणेश दहिफळे हे पाण्याच्या भोव-यात सापडून डोहामध्ये अडकले होते. तीन दिवसापासून त्यांचा शोध घेतला तरी ते अद्याप सापडले नाहीत.
दहिफळे यांचा शोध घेण्यास येथील पथकास अनेक अडचणी येत होत्या. यामुळे शनिवारी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले होते. या टीमने पाणबुडे सिलिंडरसह शोध घेतला. मेजर मनोजकुमार यांच्या नेतृत्वाखाली १८ जणांच्या पथकाने ६ तास शोध मोहीम राबविली.
पाणबुडडीच्या साहाय्याने खाली डोहामध्ये शोध घेतला. परंतु त्या बाजूने कपारी असल्याने त्यात सिलेंटर अडकण्याची शक्यता होती. एकदा एका पाणबुड्याच्या संपर्क काही वेळ तुटला. त्यानंतर त्याला वर काढले. टीमने पुन्हा शोध मोहीम सुरू केली. तरीही दहिफळे यांचा शोध लागला नाही. अखेरीस ही शोधमोहीम थांबविण्यात आली आहे, असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.