शेवगावला जुगार अड्ड्यावर छापा; 55 लोकांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:17 IST2020-12-10T13:16:33+5:302020-12-10T13:17:04+5:30

शेवगाव :  शेवगाव येथे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा घालून 55 लोकांना ताब्यात  घेतले आहे.

Raid on Shevgaon gambling den; 55 people detained | शेवगावला जुगार अड्ड्यावर छापा; 55 लोकांना घेतले ताब्यात

शेवगावला जुगार अड्ड्यावर छापा; 55 लोकांना घेतले ताब्यात

शेवगाव :  शेवगाव येथे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा घालून 55 लोकांना ताब्यात  घेतले आहे.

शेवगाव  येथील फिरोज इनामदार यांच्या मालकीच्या जागेत बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही लोक जुगार खेळत असताना दिसून आले. यावेळी नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रदीप दिघावकर यांच्या विशेष पथकाने रात्री हा छापा घातला. यामध्ये 55 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  जुगार खेळत असताना विशेष पथकाच्या या कारवाईत 38 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.  यामध्ये मोटरसायकल रोख रक्कम आणि जुगार खेळण्याचे साहित्य यांचा समावेश आहे.  या कारवाईमध्ये अनेक प्रतिष्ठित यांनाही ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष पोलीस पथकाच्या या कारवाईने जिल्हा पोलीस दल आणि शेवगाव मध्ये ही मोठी खळबळ उडाली.

Web Title: Raid on Shevgaon gambling den; 55 people detained