वांगदरीत वाळू तस्करीवर छापा; २७ लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 17:40 IST2020-08-09T17:40:18+5:302020-08-09T17:40:46+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील वांगदरी शिवारातील डोमाळवाडीजवळ घोडनदीपत्रात पोलिसांंनी छापा टाकून अवैध वाळू चोरी करणारे तीन ट्रक, चार ब्रास वाळू असा एकूण २७ लाख १६ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. रविवारी (९ आॅगस्ट) मध्यरात्री अडीच वाजता ही कारवाई केली.

वांगदरीत वाळू तस्करीवर छापा; २७ लाखाचा मुद्देमाल जप्त
श्रीगोंदा : तालुक्यातील वांगदरी शिवारातील डोमाळवाडीजवळ घोडनदीपत्रात पोलिसांंनी छापा टाकून अवैध वाळू चोरी करणारे तीन ट्रक, चार ब्रास वाळू असा एकूण २७ लाख १६ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. रविवारी (९ आॅगस्ट) मध्यरात्री अडीच वाजता ही कारवाई केली.
पोलीस कॉन्स्टेबल अमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक एम.एच.१२, डिटी ९९८१ याचा चालक, मालक बालाजी केंद्रे (रा.चंदननगर, जि. पुणे), ट्रक क्रमांक एम. एच. ४२, बी.-९२६० वरील चालक, मालक, ट्रक क्रमांक एम. एच.१६, एई-७३७७ वरील चालक मालक यांच्याविरोधात विनापरवाना बेकायदा अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक दौलतराव पवार मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,
पो. कॉ.अमोल आजबे,पो. कॉ. प्रताप देवकाते, पो. कॉ. कुलदीप घोळवे, पो. कॉ. इंगवले या पोलीस पथकाने ही कारवाई केली.