शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

नगरच्या उड्डाणपुलाचा प्रश्न अंतिम टप्प्यात; खासदार सुजय विखे : स्पर्धा परीक्षा केंद्राचाही प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 11:56 IST

नगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. लष्कराने काम सुरु करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले असून संरक्षण विभागाच्या सचिवांची स्वाक्षरी झाल्यानंतर या पुलाचा मार्ग मोकळा होईल, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

अहमदनगर : नगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. लष्कराने काम सुरु करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले असून संरक्षण विभागाच्या सचिवांची स्वाक्षरी झाल्यानंतर या पुलाचा मार्ग मोकळा होईल, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विखे यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी संवाद साधताना ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे विकासाचे अनेक प्रकल्पही अडकून पडले आहेत. मात्र, जागतिक संकट असल्याने यास काहीही पर्याय नव्हता. आता लॉकडाऊन हळूहळू कमी होऊन जनजीवन पूर्वपदावर येईल अशी आशा आहे. नगर शहराच्या विकासासाठी उड्डाणपुलाची नितांत आवश्यकता आहे. त्याची निविदाही झालेली आहे. ठेकेदारही नियुक्त केला गेला आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे काम अडले आहे. कामास विलंब झाल्याने ठेकेदाराने दिलेल्या बँक गॅरंटीची मुदत संपली होती. ही मुदत वाढविण्याची मागणी आपण केली होती. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीने ही मुदत वाढविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुन्हा निविदा मागविण्याची गरज भासणार नाही. या पुलासाठी संरक्षण विभागाने ना हरकत दिली असून संरक्षण सचिवांची स्वाक्षरी झाल्यानंतर हा प्रश्न निकाली निघेल. लॉकडाऊन संपताच यासाठी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करणार आहे. नगर महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे. याच इमारतीच्या मागील बाजूला दोन टप्प्यात नवीन इमारत बांधण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. महापालिकेने यासाठी जिल्हा नियोजनकडे निधीची मागणी करावी अशी सूचना आपण केली आहे. प्रोफेसर चौकात जी महापालिकेची इमारत आहे. तेथे जनतेसाठी एमआरआय व लॅबची सुविधा देण्यासाठी पालिकेला जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर आहे. हे काम मार्गी लागल्यास शहरातील सामान्य जनतेसाठी ती चांगली सुविधा निर्माण होईल. यादृष्टीनेही आपण प्रशासनाच्या संपर्कात आहोत. आपण आरोग्य व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे हे कोरोना संकटातून निदर्शनास आले आहेत. त्यामुळे नगर शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आपण महापौर व महापालिकेच्या संपर्कात आहोत. जिल्हा रुग्णालय हे कोविड सेंटर जाहीर झाल्याने तेथे इतर रुग्णांची तपासणी करण्याबाबत मर्यादा होत्या. त्यामुळे विळद घाटात विखे फाउंडेशनच्या रुग्णालयात अशा साडेतीनशे प्रसूती करण्यात आल्या, असे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा केंद्र चालविण्याची तयारी महापालिकेचे सावेडीत ‘प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र’ आहे. मात्र हे केंद्र सध्या बंद आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या मुलांची गैरसोय होत आहे. महापालिकेने परवानगी दिल्यास जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून हे केंद्र अत्यंत सक्षमपणे चालविले जाईल. त्यासाठी आपण महापालिकेशी पत्रव्यवहार करणार आहोत, असे ते म्हणाले. ७५ हजार कुटुंबांना किराणा व अन्नछत्रलॉकडाऊनच्या काळात आपण मतदारसंघात प्रत्येक जिल्हा परिषद गटात संपर्क करुन जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्ह्यात ७५ हजार गरजू कुटूंबांना जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून किराण्याचे वाटप केले. लोणी येथे आठ दिवस दररोज ४० हजार नागरिकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी अन्नछत्र चालविले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेinterviewमुलाखत