मराठा आरक्षणाबाबत बुधवारी नगरला जनसुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 19:55 IST2018-05-01T19:47:04+5:302018-05-01T19:55:01+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत नगरला बुधवारी जनसुनावणी होणार आहे. यावेळी नागरिकांना आयोगासमोर आपले निवेदन सादर करता येणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत बुधवारी नगरला जनसुनावणी
अहमदनगर - मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत नगरला बुधवारी जनसुनावणी होणार आहे. यावेळी नागरिकांना आयोगासमोर आपले निवेदन सादर करता येणार आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविला आहे. हा आयोग सरकारला या आरक्षणाबाबत शिफारस करणार आहे. त्यासाठी आयोगाचे सदस्य राज्याचे दौरे करून जनसुनावणी घेत नागरिकांचे म्हणणे विचारात घेत आहेत. नगरला बुधवारी दुपारी ११ ते ५ या वेळेत शासकीय विश्रामगृहावर ही सुनावणी होणार आहे. यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, बाळ सराफ, राजाभाऊ करपे हे उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना आयोगाकडे आरक्षणाबाबत यावेळी आपले म्हणणे मांडता येणार आहे.