गौतम हिरण यांच्या हत्येचा देवळालीत निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST2021-03-09T04:23:16+5:302021-03-09T04:23:16+5:30
राहुरी : बेलापूर येथील प्रथितयश व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचे अपहरण करून क्रूर हत्या झाल्याबद्दल देवळाली प्रवरा व्यापारी असोसिएशनच्या ...

गौतम हिरण यांच्या हत्येचा देवळालीत निषेध
राहुरी :
बेलापूर येथील प्रथितयश व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचे अपहरण करून क्रूर हत्या झाल्याबद्दल देवळाली प्रवरा व्यापारी असोसिएशनच्या वतीने सोमवारी आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत निषेध केला.
शिवाजी चौक येथे श्रद्धांजली व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील सर्व व्यापाऱ्यांनी हिरण यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोषींना कठोर शिक्षा करण्यासाठी असोसिएशनच्या वतीने पोलीस खात्याला निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी देवळाली प्रवरा गाव बंद ठेवून हिरण यांच्या हत्येचा निषेध केला. दोषींवर लवकर कारवाई झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला.
या निषेध सभेला ललित देसर्डा, आप्पासाहेब ढुस, नेमीचंद शिंगी, डॉ. संदीप मुसमाडे, जालिंदर मुसमाडे, महावीर गदिया, संतोष मुथा, पोपट चंगेडे, सुभाष देसर्डा, डॉ. प्रवीण बोरा, हेमराज वर्मा, आनंद देसर्डा, संतोष देसर्डा, आशिष देसर्डा, सतीश मुथा, हेमंत चोरडिया, सावळेराम कदम, अशोक कदम, अशोक मुसमाडे, विजय कदम, योगेश जाधव, राम शिंदे, अब्बास पटेल, देवदत्त मुसमाडे, श्रीकांत चांडक, गणेश कांबळे, प्रमोद शिंगी, सकाहरी भांड आदी उपस्थित होते.