शिवसेना उपनेते राठोड यांच्या तडीपारीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:15 IST2019-01-30T06:14:59+5:302019-01-30T06:15:17+5:30

दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार करण्याची शिफारस

Proposal for the abolition of Shiv Sena Deputy leader Rathore | शिवसेना उपनेते राठोड यांच्या तडीपारीचा प्रस्ताव

शिवसेना उपनेते राठोड यांच्या तडीपारीचा प्रस्ताव

अहमदनगर : शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांचा तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केला आहे़ त्यांना दोन वर्षांसाठी नगर शहरातून तडीपार करावे, अशी शिफारस या अहवालामध्ये आहे.

राठोड यांच्यावर कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत़ त्यांच्यामुळे नगर शहरात अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यांना नगर शहरातून हद्दपार करावे असे तोफखाना पोलिसांनी प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे़ सदरचा प्रस्ताव चौकशीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे पाठविला आहे़ या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालातून राठोड यांना नोटीस काढून म्हणणे सादर करण्याचे सांगण्यात आले होते.

Web Title: Proposal for the abolition of Shiv Sena Deputy leader Rathore