अहिल्यानगर-छ.संभाजीनगर महामार्गावर खासगी बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 12:47 IST2024-10-23T12:46:35+5:302024-10-23T12:47:46+5:30
आगीत सदर बस पूर्णपणे जाळून खाक झाली असून बस मधील सर्व १५ सुदैवाने बचावले.

अहिल्यानगर-छ.संभाजीनगर महामार्गावर खासगी बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले
सुहास पठाडे -
नेवासा : अहिल्यानगर-छ.संभाजीनगर महामार्गावर खाजगी बसचे टायर फुटून अचानक आग लागली. सदर घटना आज (बुधवार) पहाटे ५ च्या सुमारास खडका फाटा टोलनाका येथे घडली आहे. आगीत सदर बस पूर्णपणे जाळून खाक झाली असून बस मधील सर्व १५ सुदैवाने बचावले.
मंगळवारी रात्री भोसरी पुणे येथून जामोद (जळगाव) कडे निघालेल्या साईराम ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला (क्र. एम एच-१९-वाय-३१२३)नेवासा तालुक्यातील खडका फाटा टोलनाका येथे आग लागली.प्राथमिक माहितीनुसार बसचा टायर फुटल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे.यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी बस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले..
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचेसह पोलीस घटनास्थळी पोहचले व वाहतूक सुरळीत चालू केली तसेच भेंडा येथील लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले...