श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर कारागृहातून कैदी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 13:27 IST2018-06-18T13:26:17+5:302018-06-18T13:27:23+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातून खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला कैदी महेश उर्फ बापू शिवाजी चव्हाण हा सोमवार १८ जूनला सकाळी कारागृहातून फरार झाला.

Prisoner escaped from Visapur jail in Shrigonda taluka | श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर कारागृहातून कैदी फरार

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर कारागृहातून कैदी फरार

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातून खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला कैदी महेश उर्फ बापू शिवाजी चव्हाण हा सोमवार १८ जूनला सकाळी कारागृहातून फरार झाला.
तो महात्मा गांधी रोड, दिवा बेलापूर रोड, नवी मुंबई येथील रहिवासी आहे. ठाणे न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याची चांगली वर्तणूकपाहून त्याला २०१३ मध्ये विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहात वर्ग करण्यात आले होते. त्याने येरवडा व विसापूर कारागृहात यापूर्वी कधीही सुट्टी घेतलेली नाही.
सोमवारी सकाळी चहा पिण्याच्या बहाण्याने बराकीतून तो बाहेर पडला होता. त्यानंतर कारागृहाच्या पूर्वेकडील संरक्षक भिंतीवरून उडी मारून तो फरार झाला. कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे, तुरुंगाधिकारी बाळकृष्ण जासूद, राजेंद्र पवार व कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. परंतु तो सापडला नाही. कारागृह प्रशासनाच्या वतीने बेलवंडी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद देण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Prisoner escaped from Visapur jail in Shrigonda taluka