प्राचार्य आर. टी. शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST2021-05-04T04:09:52+5:302021-05-04T04:09:52+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य आर. टी. शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त ग्रामस्थांच्या ...

प्राचार्य आर. टी. शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य आर. टी. शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
देवदैठण, रांजणगाव गणपती, शिरूर, शिक्रापूर येथे ज्ञानदानाचे कार्य करून उत्तम विद्यार्थी घडविण्याचे कार्य त्यांनी केले. ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते निवृत्त झाले. त्यानिमित्ताने शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने कोरोना नियम पाळून सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमोद रूपनर, उद्योजक अतुल लोखंडे, पर्यवेक्षक संपतराव गाडेकर, आर. टी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी दत्तात्रय लोखंडे, लक्ष्मीकांत दंडवते, पर्यवेक्षक संपतराव गाडेकर, उद्योजक वसंत बनकर, उद्योजक अतुल लोखंडे, दीपक वाघमारे, विजय कोकाटे उपस्थित होते.
सूत्रसंचालन संजया नितनवरे, प्रास्ताविक रंभा विराट यांनी केले. संदीप घावटे यांनी आभार मानले.
--
०३ देवदैठण
देवदैठण येथे मुख्याध्यापक आर. टी. शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान करताना ग्रामस्थ.