संतापजनक! प्राचार्याने ९ वर्षांच्या मुलाला अभ्यासासाठी घरी बोलावलं अन् लैंगिक अत्याचार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:44 IST2025-02-10T12:44:16+5:302025-02-10T12:44:32+5:30

या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Principal calls 9 year old boy home to study and sexually assaults him | संतापजनक! प्राचार्याने ९ वर्षांच्या मुलाला अभ्यासासाठी घरी बोलावलं अन् लैंगिक अत्याचार केले

संतापजनक! प्राचार्याने ९ वर्षांच्या मुलाला अभ्यासासाठी घरी बोलावलं अन् लैंगिक अत्याचार केले

Crime News : एका प्राचार्यांने नऊ वर्षीय शाळकरी मुलाला अभ्यासाला बोलवून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना केडगाव उपनगरात घडली असून पीडित मुलाच्या आईने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष सुधाकर देवरे असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच देवरे पसार झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी देवरे हा पीडित मुलाला वेळोवेळी अभ्यासाच्या बहाण्याने स्वतःच्या रूमवर बोलवत होता. अभ्यासाच्या नावाखाली मुलाचा लैंगिक छळ करायचा. याबाबत कोणाला काही सांगितले तर आई-वडिलांना मारून टाकू, अशी धमकी द्यायचा. २४ जानेवारी व त्यापूर्वी वेळोवेळी त्याने असा प्रकार केला. पीडित मुलाने घरी सांगितल्यावर पालकांनी थेट पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ३५१ (२) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ९, १०, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्य संतोष देवरे पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 

Web Title: Principal calls 9 year old boy home to study and sexually assaults him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.