पंतप्रधान म्हणाले.... तुझे नाव काय आहे?
By Admin | Updated: July 13, 2014 00:18 IST2014-07-12T23:39:03+5:302014-07-13T00:18:44+5:30
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हापासून नरेंद्र मोदी हे नाव आणि या नावाची व्यक्ती सतत टीव्हीवर पाहत होतो.
पंतप्रधान म्हणाले.... तुझे नाव काय आहे?
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हापासून नरेंद्र मोदी हे नाव आणि या नावाची व्यक्ती सतत टीव्हीवर पाहत होतो. पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांचा टीव्हीवरचा वावर आणखी वाढला. तेव्हापासून या व्यक्तीप्रती एक वेगळेच आकर्षण वाटायला लागले. परंतु भविष्यात कधी आपला मुलगा नरेंद्र मोदी यांना भेटेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र लोकमत ग्रीन कीडस्च्या स्पर्धेत विजयी झालेल्या प्रसादला ही संधी चालून आली, असे प्रसादचे वडील सांगत होते. प्रसाद म्हणाला, ‘संसदेच्या परिसरात मोदी आमच्यासमोर होते आणि चक्क मराठीत बोलत होते. तुझे नाव काय? असे विचारल्यावर मी त्यांना सांगितले.....प्रसाद भालचंद्र साळवे, राहणार अहमदनगर’
‘संस्काराचे मोती-२०१३’ च्या हवाई सफरीचा विजेता ठरलेल्या भिंगार येथील नवीन मराठी प्रशालेचा प्रसाद भालचंद्र साळवे (वर्ग तिसरी) याला विमानाने जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट घालून देण्याचा उपक्रम ‘लोकमत’ने राबविला होता. नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणण्याबरोबरच मुलांना दिल्लीमधील राष्ट्रपती भवन, संसद, इंडिया गेट आदी ठिकाणे दाखविण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातून एका मुलाची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली होती. या मुलांच्या टीममध्ये सर्वात लहान वयाचा प्रसाद साळवे याला मोदी यांची भेट घेण्याची सुवर्णसंधी मिळाली होती.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना दुपारी वेळात वेळ काढून पंतप्रधान मोदी यांची ‘लोकमत’च्या विजेत्यांशी तब्बल १३ मिनिटे संवाद साधला. प्रसाद हा लहान असल्याने तो मोदी यांच्या जवळच बसला होता. प्रसादने शनिवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी बोबड्या बोलात त्याने आपले मोदी यांच्या भेटीतील अनुभव कथन केले. मोदी यांना त्याने पहिल्यांदा टीव्हीवर पाहिले होेते. अब की बार मोदी सरकार....या जाहिराती त्याच्या तोंडपाठ आहेत.
संसदेच्या हॉलमध्ये पोहोचल्यानंतर मोदी यांनी मला डोळ््यांनी खूण करून जवळ बोलावून घेतले. त्यांच्या हातात हात दिला. गप्पा मारण्यासाठी ते जेव्हा बसले, तेव्हा अगदी त्यांच्याजवळच मी होतो. त्यांनी अनेकवेळा माझ्या पाठीवरून, डोक्यावरून हात फिरविले. त्यांनी माझी कटिंग पाहिली. तुझी कटिंग कोणी केली, असे त्यांनी विचारले तेव्हा प्रसाद म्हणाला, तात्यांनी केली आहे. (तात्या म्हणजे कटिंगवाले). यावर सर्वच हास्यकल्लोळात बुडाले.
प्रसादचे वडील तारकपूर येथील एका दुकानावर कामाला आहेत. ते म्हणाले, गेल्या सात-आठ वर्षांपासून लोकमत वाचतो आहे. आईसह कुटुंबातील सर्वच लोकमत वाचतात. संस्काराचे मोती स्पर्धेत कूपन चिटकविण्याची प्रसादला भारी हौस होती. केवळ लोकमतमुळेच प्रसाद पंतप्रधानांना भेटू शकला. (प्रतिनिधी)
काय म्हणाले मोदी...
विमानाचा प्रवास संपला आणि संसदेच्या परिसरात गेलो. टीव्हीवरचे हेच ते मोदी प्रत्यक्ष समोर बघून खूप आनंद झाला. संसदेच्या परिसरात खूप गर्दी होती. सर्वजण एका खोलीत दाखल झाले. काहीवेळातच गार्ड आले आणि त्यांनी तेथे चकरा मारल्या. नंतर मोदी समोर आले आणि त्यांना प्रत्यक्ष पाहिले.खूप शिका, अभ्यास करा, मोठे व्हा, देशाची सेवा करा, असे मोदी सांगत होते, असे प्रसाद सांगतो.
पहिल्यांदाच विमानात बसलो.... विमानातून ढग आणि माणसं पाहिली... पहिल्यांदाच दिल्ली पाहिली....‘अब की बार, मोदी सरकार’ अशा टीव्हीवरल्या जाहिराती म्हणणाऱ्या प्रसादने जेव्हा प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहिले, त्यावेळी तो अक्षरक्ष: भारावला. प्रसाद म्हणतो, ‘त्यांनी मला मांडीवर घेतले आणि माझे नाव विचारले.