वादळाच्या तडाख्याने शिरसगावात दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:27 IST2020-06-05T13:27:09+5:302020-06-05T13:27:43+5:30
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव परिसराला निसर्ग चक्री वादळाचा तडाखा बसला आहे. यात झाडांची पडझड होवून झाडांच्या फांद्या वीज वाहक तारेवर पडल्या आहेत. यामुळे शिरसगावातील वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे.

वादळाच्या तडाख्याने शिरसगावात दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडित
शिरसगाव : कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव परिसराला निसर्ग चक्री वादळाचा तडाखा बसला आहे. यात झाडांची पडझड होवून झाडांच्या फांद्या वीज वाहक तारेवर पडल्या आहेत. यामुळे शिरसगावातील वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे.
पावसाळा सुरू होण्याआधी संबधित वीज वितरण कंपनीच्या वतीने झाडे छाटण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र शिरसगावातील चौधरी डीपीजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाची छाटनी अद्याप झाली नाही.
निसर्ग चक्री वादळाने वीज खांबावरील तारेला तार चिटकल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाले आहे. शेतातील पिकांनाही पाणी देता येत नाही. तरी तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.