शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नेत्यांच्या गावांतील मतदान फुटले!

By admin | Updated: March 20, 2024 11:47 IST

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडीच्या मनसुब्यांना धक्का तर दिलाच; पण त्यांच्या बाजूने उभे राहिलेल्या शिलेदारांची ठाणेही काबीज केली.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडीच्या मनसुब्यांना धक्का तर दिलाच; पण त्यांच्या बाजूने उभे राहिलेल्या शिलेदारांची ठाणेही काबीज केली. मात्तबरांच्या मुलखातही महायुतीच्या विजयाचा वारू चांगलाच उधळला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते, शिवाजीराव नागवडे, प्रताप ढाकणे यांच्या गावात चक्क गांधींना मताधिक्क्य मिळाले! तर कॉँग्रेसचे मंत्री थोरात, विखे तसेच राष्टÑवादीचे नेते मधुकर पिचड, शंकरराव कोल्हे, भानुदास मुरकुटे व यशवंतराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना त्यांच्या गावातील मतदारांनीही शिर्डी मतदारसंघात सेनेचे सदाशिव लोखंडे यांना भरभरुन मतदान केले. शिर्डी मतदारसंघात कॉँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्टÑवादीचे आमदार शंकरराव गडाख व मंत्री मधुकर पिचड या दिग्गज नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील कांबळे वगळता उर्वरित सगळेच सहकार सम्राट. या माध्यमातून त्यांची ग्रामीण भागावर चांगली पकड. पण ती ही मोदी लाटेत सैल झाल्याचे निकालातून समोर आले. राजळेंच्या गावात गांधींना मते नगर मतदारसंघात आघाडीच्या नेत्यांनी राजीव राजळे यांना लीड तर दिला नाहीच, पण गांधींना आपापल्या गावांतून आघाडी दिली. पाचपुते यांच्या काष्टीतून गांधींना ३७१, नागवडेंच्या वांगदरीत ५२४ मतांचे मताधिक्क्य मिळाले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या ढाकणेंच्या अकोल्यातही राजळेंपेक्षा गांधींना ५ मते जास्तीची आहेत. घुलेंच्या दहिगाव ने मध्येही तसेच जि.प. सदस्य सुजित झावरेंच्या वासुंदे येथेही गांधींनी जवळपास निम्मी मते घेतली.एकीकडे ही स्थिती असली तरी भाजपाच्या आ. राम शिंदे यांच्या चौंडीत राजळेंनाही मताधिक्क्य मिळाले नसले तरी त्यांनी निम्मी मते घेतली. आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या बुºहाणनगर केंद्रावरही राजळेंना २५ टक्के मते मिळाली. राजळेंच्या स्वत:च्या गावात गांधींना १० टक्के मते मिळाली आहेत. साखरसम्राट घरातच निष्प्रभ शिर्डी मतदार संघात राष्टÑवादी, कॉँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. सहकारसम्राट असलेल्या या नेत्यांच्या हाती ग्रामीण भागाच्या विकासाच्या नाड्या एकवटल्या. ग्रामीण भागातील जनता आपल्यापुढे जात नाही. शिर्डी मतदारसंघात कृषीमंत्री राधाकृष्ण विखे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गाव येते. विखे व थोरात यांच्या गावातूनच आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे पिछाडीवर पडले. थोरात यांच्या जोर्वे गावातील तीन मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानापैकी वाकचौरे यांना ५१५ तर महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना १ हजार ३१३ मतदान पडले. विखे यांच्या लोणी बु.मध्ये वाकचौरे यांना १ हजार १७० तर लोखंडे यांना २ हजार ५५० इतके मतदान झाले. कॉँग्रेसचे मंत्री असलेल्या विखे,थोरात यांच्या गावातूनच आघाडीचे उमेदवार वाकचौरे यांच्यापेक्षा लोखंडे यांनी दुपटीने लीड घेतले. राजूरमध्ये लोखंडे दुप्पट राष्टÑवादीचे मंत्री मधुकर पिचड यांच्या राजूर गावातही महायुतीचे लोखंडे हे वाकचौरे यांच्यापेक्षा दुपटीने लीडवर आहेत. लोखंडे यांना २ हजार ३९८ तर वाकचौरे यांना १ हजार २४४ मते मिळाली. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सोनई गावातही लोखंडे यांना दोन हजार मतांचे लीड आहे. आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांना ३ हजार ३५ तर महायुतीचे लोखंडे यांना ५ हजार ७०३ मते मिळाली. याच मतदारसंघातील जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या शिरसगाव गावातही लोखंडे यांना लीड मिळाले. वाकचौरे यांना ४४४ तर लोखंडे यांना ६२४ मते मिळाली. श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर या भानुदास मुरकुटे यांच्या गावातही लोखंडे यांनाच लीड आहे. वाकचौरे यांना ४१० तर लोखंडे यांना ५९३ मते मिळाली आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या येसगावात तर महायुतीचे लोखंडे यांनी तिपटीने मते घेत बाजी मारली. वाकचौरे यांना ३७२ मते मिळाली तर लोखंडे यांना १ हजार ७७ मते मिळाली आहेत. अपेक्षांवर पाणी राहुरी, श्रीगोंदा आणि पाथर्डी-शेवगाव या तालुक्यांतून मताधिक्क्य मिळेल, अशी राजळे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपेक्षा होती. मात्र, तेथे झाले उलटेच. राष्ट्रवादीसोबतच काँग्रेसच्या शिवाजीराव नागवडे यांच्याकडून त्यांना मोठी रसद मिळण्याची आशा होती. परंतु ती ही फोल ठरली.