राजकीय भूकंपाचे झटके मलाही बसले : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 14:30 IST2019-11-23T14:30:29+5:302019-11-23T14:30:57+5:30

राज्यातील राजकारणातील मोठ्या भूकंपाचे झटके मलाही सकाळी बसले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार स्थिर सरकार असेल, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. 

Political earthquake shocks me too: Sujay Vikhe | राजकीय भूकंपाचे झटके मलाही बसले : सुजय विखे

राजकीय भूकंपाचे झटके मलाही बसले : सुजय विखे

अहमदनगर : राज्यातील राजकारणातील मोठ्या भूकंपाचे झटके मलाही सकाळी बसले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार स्थिर सरकार असेल, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी सकाळी राजभवनात शपथविधी पार पडला. याची माहिती मला शनिवारी सकाळीच समजली. गेल्या दोन दिवसात मुंबईत वेगाने राजकीय घडामोडी सुरू होत्या. खासदार विखे हे शनिवारी सकाळी आपल्या शिर्डी मतदारसंघातच होते. सकाळी ९.३० वाजता प्रवरानगर (ता.राहाता) येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन व ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाच्या ठिकाणी विखे उपस्थित झाले होते. यावेळी त्यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठले. यावेळी खा. विखे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकºयांच्या हिताचे काम करेल यात शंका नाही. पाच वर्षे राज्यात स्थिर सरकार राहील, असेही ते म्हणाले. 

Web Title: Political earthquake shocks me too: Sujay Vikhe