नगरमध्ये रूग्णवाहिकेच्या चालकास पोलिसांकडून मारहाण; चालकांनी पुकारला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 15:39 IST2020-04-05T15:38:35+5:302020-04-05T15:39:57+5:30
रूग्णवाहिका एका रुग्णास आणण्यासाठी हॉस्पीटलमध्ये जात असताना तिच्या चालकाला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना रविवारी (५ एप्रिल) नगर शहरातील चौपाटी कारंजा परिसरात घडली. दरम्यान या घटनेचा रुग्णवाहिकेच्या चालक संघटनेने निषेध केला असून सर्व रुग्णवाहिका चालकांनी बंद पाळला आहे.

नगरमध्ये रूग्णवाहिकेच्या चालकास पोलिसांकडून मारहाण; चालकांनी पुकारला बंद
अहमदनगर : रूग्णवाहिका एका रुग्णास आणण्यासाठी हॉस्पीटलमध्ये जात असताना तिच्या चालकाला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना रविवारी (५ एप्रिल) नगर शहरातील चौपाटी कारंजा परिसरात घडली. दरम्यान या घटनेचा रुग्णवाहिकेच्या चालक संघटनेने निषेध केला असून सर्व रुग्णवाहिका चालकांनी बंद पाळला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरातील एक रुग्णवाहिका एका रुग्णास आणण्यासाठी जात होती. यावेळी पोलिसांनी या रुग्णवाहिकेचा चालक अक्षय वाघमारे यास बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती सर्व रुग्णवाहिकेच्या चालकांना कळताच चालक संघटनेच्या वतीने पोलिसांच्या निषेधार्थ बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही पण अत्यावश्यक सेवेसाठी मदत करीत आहोत. तुम्ही पण करता? पण रुग्णवाहिकेच्या चालकांना मारहाण करणे योग्य नाही. मारहाण करणाºया पोलिसांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी चालक संघटनेच्या वतीने केली आहे. दरम्यान कारवाई होईपर्यंत बंद मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी नगर शहरातील नागापूर एमआयडीसी परिसरात महानगरपालिकेच्या कर्मचाºयांना जंतुनाशक फवारणी करताना नागरिकांनी मारहाण केली होतीे. यावेळी पालिका कर्मचाºयांनी बंद पाळला होता. हा बंद शनिवारी मागे घेतला होता.