नगर-कल्याण बायपासवर मृतदेह सापडल पोलिसांना खुणाचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 16:43 IST2020-11-12T16:42:42+5:302020-11-12T16:43:19+5:30
अहमदनगर : लामखडे पेट्रोल पंपाजवळ चालकाच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. रामदास बन्सी पंडित (रा. निंबळक ता. नगर) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. व्यवसायाने तो चालक आहे. हत्या कोणत्या कारणावरून झाली हे स्पष्ट झाले नाही.

नगर-कल्याण बायपासवर मृतदेह सापडल पोलिसांना खुणाचा संशय
अहमदनगर : लामखडे पेट्रोल पंपाजवळ चालकाच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. रामदास बन्सी पंडित (रा. निंबळक ता. नगर) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. व्यवसायाने तो चालक आहे. हत्या कोणत्या कारणावरून झाली हे स्पष्ट झाले नाही.
रामदास पंडित हे केडगाव येथे चालक म्हणून कामाला आहे. बुधवारी रात्री त्यांनी केडगाव येथून घरी येत असल्याची माहिती फोन करून घरच्यांना दिली होती. यानंतर रामदास घरी आले नाही व त्यांचा फोन बंद येत होता. त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. आज सकाळी रामदास यांचा मृतदेह कल्याण बायपास जवळील लामखडे पेट्रोल पंपाजवळ मिळून आला. त्यांच्या गळ्यावर हत्याराचे वार आहेत. रामदास यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.