देवळाली प्रवरा परिसरात तीन दारूभट्ट्यांवर पोलिसांचे छापे; दारू, रसायन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:04 IST2020-06-09T12:04:08+5:302020-06-09T12:04:43+5:30

राहुरी पोलिसांनी देवळाली परिसरात गेल्या दोन दिवसात तीन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दारूचे रसायनासह इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी  तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Police raids on three distilleries in Deolali Pravara area; Alcohol, chemicals confiscated | देवळाली प्रवरा परिसरात तीन दारूभट्ट्यांवर पोलिसांचे छापे; दारू, रसायन जप्त

देवळाली प्रवरा परिसरात तीन दारूभट्ट्यांवर पोलिसांचे छापे; दारू, रसायन जप्त

 राहुरी : राहुरी पोलिसांनी देवळाली परिसरात गेल्या दोन दिवसात तीन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दारूचे रसायनासह इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी  तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 पो.कॉ.दादासाहेब रोखले यांच्या फिर्यादीवरून देवळाली प्रवरा येथे आरोपी तात्या दादा गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून ९ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

दुस-या घटनेत याच परिसरात बारा लिटर गावठी दारू तसेच रासायनिक असा सात हजाराचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रवीण अहिरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाळासाहेब भाऊसाहेब गायकवाड (रा.देवळाली प्रवरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तिस-या घटनेत याच परिसरात गावठी दारू बनविण्याचे रसायन, सात लिटर तयार गावठी दारू असे साहित्य जप्त करण्यात आले. पो.कॉ. गणेश फाटक यांच्या फिर्यादीवरून आरोपी गोरख बबन गायकवाड (रा.देवळाली प्रवरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तर आणखी एका हातभट्टीवर छापा टाकून ५८०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी बबन बंडू पवार याच्याविधरुद गुन्हा  दाखल केला आहे.  पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: Police raids on three distilleries in Deolali Pravara area; Alcohol, chemicals confiscated