श्रीगोंद्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; दोघांसह तीन महिला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 17:22 IST2020-05-27T17:22:09+5:302020-05-27T17:22:32+5:30
श्रीगोंदा पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाºया एका घरावर छापा टाकला. संजय जाधव (रा.आढळगाव, ता.श्रीगोंदा), अकबर बागवान छोटू शेख (रा.खोसपुरी, ता.नगर) यांच्यासह तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बुधवारी दुपारी ही कारवाई केली.

श्रीगोंद्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; दोघांसह तीन महिला ताब्यात
श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाºया एका घरावर छापा टाकला. संजय जाधव (रा.आढळगाव, ता.श्रीगोंदा), अकबर बागवान छोटू शेख (रा.खोसपुरी, ता.नगर) यांच्यासह तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बुधवारी दुपारी ही कारवाई केली.
पोलीस उपाधीक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना श्रीगोंदा शहरातील एका घरात पुन्हा वेश्या व्यवसाय सुरु झाल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलिसांनी खातरजमा केली. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हवालदार रोहिदास झुंजार, अमोल आजबे, खारतोड़े, महिला पोलिस कर्मचारी लता पुराणे, छाया माने यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तीन आंबटशौकीन त्या ठिकाणी आढळून आले. त्याचबरोबर तीन महिला आढळून आल्या. पोलीस पथकाने त्या तिघांसह मालकाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.