शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तपासाला बोगस सीमकार्डची दिशा

By admin | Updated: April 28, 2023 15:38 IST

अहमदनगर: भाटिया खून प्रकरणातील आरोपी प्रदीप कोकाटे याने बोगस सीमकार्ड काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे़

अहमदनगर: भाटिया खून प्रकरणातील आरोपी प्रदीप कोकाटे याने बोगस सीमकार्ड काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे़ सीमकार्डचा वापर कशासाठी केला, त्यावरून आरोपीने कुणाशी संवाद केला, यासह अन्य तपासासाठी आरोपी शप्पू उर्फ प्रदीप कोकाटे याला बुधवारी न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी़ ए़ गायकवाड यांनी हा निकाल दिला़ गंजबाजारातील ट्रंक डेपोचे मालक जितेंद्र भाटिया यांच्या खुनाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे़ या प्रकरणात भाटिया यांची पत्नी दिव्या उर्फ हेमा व तिचा प्रियकर प्रदीप कोकाटे हे पोलीस कोठडीत आहेत़ आरोपी कोकाटे याला बुधवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले होते़ भाटिया यांचा खुनाचा प्रकार गंभीर असल्याचा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला़ या प्रकरणातील दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे़ परंतु आरोपीकडे बरेच बोगस सीमकार्ड असण्याची शक्यता आहे़ते का घेतले आणि त्याचा वापर कशासाठी केला, यासह अन्य तपासासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ भाटिया यांचा खून प्रेमसंबंधातूनच केला, अशी कबुली प्रदीप व पत्नी दिव्याने दिली़ प्रेम संबंधात जितेंद्र भाटिया अडसर ठरल्याने प्रदीपने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली़ त्यास भाटियांची पत्नी दिव्याने प्रियकराला मदत केल्याचे तपासात समोर आले आहे़ पोलिसांनी आरोपीच्या घरून पिस्तूल, जीवंत काडतूस आणि दहा हजार रुपये रोख, असा मुद्देमाल जप्त केला़ आधारकार्डच्या फोटोचा वापर करून आरोपीने बरेच बोगस सीमकार्ड खरेदी केले आहे़ त्यातील दोन सीमकार्डचाच फक्त वापर आरोपी करीत होते़ दोनपैकी प्रदीपचे सीमकार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ मात्र दिव्याकडील सीमकार्ड अजून सापडले नाही़ दिव्याच्या सीमकार्डमधून कुणाला कॉल करण्यात आले़ ते कशासाठी केले गेले, हे ते सीमकार्ड सापडल्यानंतरच उघड होईल़ प्रदीपने घेतलेले सीमकार्ड कुठे ठेवले, त्याचा वापर त्याने कशासाठी केला, याचा पोलिसांना उलगडा झाला नाही़ त्याचा तपास पोलीस घेत आहेत, यासह प्रदीपने पिस्तुलसाठी पैसे कुठून आणले़ त्याला पिस्तूल घेण्यासाठी कुणी पैसे दिले आहेत का, याचा तपास लागलेला नाही, असा युक्तिवाद करीत पोलिसांनी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद केला़ त्यावरन्यायालयाने पुढील तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ (प्रतिनिधी)