वरवंडीत जमावाकडून पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:10+5:302021-02-13T04:21:10+5:30

अशोक रोहिदास गागरे (वय ५८), राजाबापू नानासाहेब वर्पे (वय ५७), संपत बाजीराव भोसले (वय २९), सुभाष रोहिदास गागरे (वय ...

Police beaten by mob in Varvandi | वरवंडीत जमावाकडून पोलिसांना मारहाण

वरवंडीत जमावाकडून पोलिसांना मारहाण

अशोक रोहिदास गागरे (वय ५८), राजाबापू नानासाहेब वर्पे (वय ५७), संपत बाजीराव भोसले (वय २९), सुभाष रोहिदास गागरे (वय ४६), बाबासाहेब तुकाराम हारदे (वय ३९), किरण सावळेराम उगले (वय २७), अनिल लक्ष्मण उगले (वय २९), विलास सोपान वर्पे (वय ४७), सोमनाथ हरिभाऊ गागरे (वय २४), शिवाजी लक्ष्मण गागरे (वय २६), बाळासाहेब सखाराम बकुळे (वय ३८), राहूल अशोक गागरे, इंदुबाई अण्णासाहेब वर्पे (सर्व रा. वरंवडी, ता. संगमनेर) यांसह इतर १५ ते २० अनोळखी व्यक्ती अशा एकुण ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्वी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नयन छबुलाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

वरंवडी ग्रामपंचायतीच्या निवडीवेळी बेकायदेशीर जमाव जमला होता. अशोक गागरे व राजाबापू वर्पे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याने जमाव बिथरला. हा जमाव पोलिसांवर धावून आला. पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पोलीस उपनिरीक्षक पाटील व पोलीस हेड कॉस्टेबल गोरक्षनाथ सदाशिव काळे हे दोघे जखमी झाले. आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधारक मांडवकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Police beaten by mob in Varvandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.