पिंपळगाव माळवी, भिंगारला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 13:03 IST2020-06-26T13:03:09+5:302020-06-26T13:03:58+5:30

भिंगार शहराला गुरुवारी (दि.२५ जून) रात्री जोरदार पावसाने झोडपून काढले. कोरडा पडलेला भिंगारनाला ही पावसाच्या पाण्याने वाहू लागला आहे. शहरातील सर्व रस्ते व चौक जलमय झाले होते. 

Pimpalgaon Malvi, Bhingar was hit by this rain | पिंपळगाव माळवी, भिंगारला पावसाने झोडपले

पिंपळगाव माळवी, भिंगारला पावसाने झोडपले

भिंगार : भिंगार शहराला गुरुवारी (दि.२५ जून) रात्री जोरदार पावसाने झोडपून काढले. कोरडा पडलेला भिंगारनाला ही पावसाच्या पाण्याने वाहू लागला आहे. शहरातील सर्व रस्ते व चौक जलमय झाले होते. 

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी परिसरात शुक्रवारी सकाळी एक तास जोरदार पाऊस झाला. यामुळे येथील सीना नदीला पूर आला होता. चिचोंडीपाटील, आठवड परिसरातही जोरदार पाऊस झाला. या पावसाने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. 

अर्बन बँकजवळील छावणी परिषद शाळेमागे पावसाने चांगलाच तडाखा दिला. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी होते. पाऊस सुरू झाल्यावर काही वेळातच गटारे तुंबली. रस्ते, गटारींजवळ राहणाºया नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने काही दुचाकी वाहून गेल्या.

Web Title: Pimpalgaon Malvi, Bhingar was hit by this rain