घरातून उचलून नेत केली मारहाण; रामवाडीतील एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 11:30 IST2021-06-15T11:28:41+5:302021-06-15T11:30:08+5:30
अहमदनगर: नगर शहरातील रामवाडी येथे 45 वर्षीय व्यक्तीच मारहाणीत मृत्यू जाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली.

घरातून उचलून नेत केली मारहाण; रामवाडीतील एकाचा मृत्यू
अहमदनगर: नगर शहरातील रामवाडी येथे 45 वर्षीय व्यक्तीच मारहाणीत मृत्यू जाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली.
कचरू दत्तू कांबळे (वय 45 रा. रामवाडी, नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी दोघा जणांनी कांबळे यांना त्यांच्या घरातून उचलून नेले. कांबळे यांना बेदम मारहाण करून सायंकाळी पुन्हा घरी आणून सोडले. मारहाणीत कांबळे यांना जबर मार लागल्याने व वेळीत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची महिती समोर आली आहे. याबाबत संबंधित मयताचे नातेवाईक यांनी बुधवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत अरोपीना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. तोफखाना पोलिसानी आरोपींचा शोध सुरु केला आहे.