पवारांच्या हेलिकॉप्टरचा सीटबेल्ट राहिला बाहेर; उड्डाण घेतल्यानंतर पुन्हा करावे लागले लॅण्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 16:16 IST2018-12-30T16:16:13+5:302018-12-30T16:16:48+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेरच राहिल्यामुळे उड्डाण घेतल्यानंतर सात मिनिटांनी हेलिकॉप्टर पुन्हा लॅण्डिंग करावे लागले. 

Pawar's helicopter seatbelt was left out; Landing is to be done again after the flight | पवारांच्या हेलिकॉप्टरचा सीटबेल्ट राहिला बाहेर; उड्डाण घेतल्यानंतर पुन्हा करावे लागले लॅण्डिंग

पवारांच्या हेलिकॉप्टरचा सीटबेल्ट राहिला बाहेर; उड्डाण घेतल्यानंतर पुन्हा करावे लागले लॅण्डिंग

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेरच राहिल्यामुळे उड्डाण घेतल्यानंतर सात मिनिटांनी हेलिकॉप्टर पुन्हा लॅण्डिंग करावे लागले. त्यावेळी मैदानावर सायकल खेळणाऱ्या मुलांचीही अचानक आलेले हेलिकॉप्टर पाहून धांदल उडाली.
नगरमधील लालटाकी येथील शिक्षक विकास मंडळाचा कार्यक्रम आटोपून पवार पुण्याला जाण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. रेसिडेन्शीअल कॉलेजच्या मैदानावर तयार केलेल्या हेलिपॅडिवरुन पवार यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. हेलिकॉप्टर गेल्यानंतर मैदानावर मुले सायकलिंग करीत होते. सुमारे सात मिनिटानंतर हे हेलिकॉप्टर पुन्हा मैदानाच्या दिशेने आले. त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस गाड्यांमधून रवाना होत होते. मात्र, हेलिकॉप्टर आल्याचे पाहून पोलिसांचीही तारांबळ उडाली. सायकलिंग करणा-या मुलांनीही जोरात पळ काढला. नुकतेच उड्डाण घेतलेले हेलिकॉप्टर पुन्हा आल्याचे पाहून पोलीसही संभ्रमात पडले. हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. पायलटने सुमारे १५ सेकंदात दरवाजा उघडून पुन्हा बंद केला आणि हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले.

Web Title: Pawar's helicopter seatbelt was left out; Landing is to be done again after the flight