महिलांच्या पुढाकारातून वृक्षसंवर्धनाचा पॅटर्न दिशादर्शक ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:43+5:302021-07-26T04:20:43+5:30
केडगाव : गावातील महिलांनी एकत्र येत वृक्षदेवता ग्रुपची स्थापना करीत गाव आणि परिसरात सुरू केलेल्या वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या पॅटर्नमुळे ...

महिलांच्या पुढाकारातून वृक्षसंवर्धनाचा पॅटर्न दिशादर्शक ठरणार
केडगाव : गावातील महिलांनी एकत्र येत वृक्षदेवता ग्रुपची स्थापना करीत गाव आणि परिसरात सुरू केलेल्या वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या पॅटर्नमुळे गावाचा चेहरा मोहरा बदलून गाव हरित ग्राम होईल. तसेच येथील महिलांचा हा पॅटर्न जिल्ह्यातील इतर गावांना दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक गिरीश भुंजे यांनी काढले.
नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील महिलांनी वृक्षमित्र सचिन कडूस यांच्या पुढाकाराने वृक्षदेवता ग्रुपची स्थापना करीत गाव आणि परिसरात बीजारोपण, वृक्षारोपण, घनवन प्रकल्प, स्मशानभूमीत स्मृती उद्यान असे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. त्याची पाहणी करीत महाव्यवस्थापक गिरीश भुंजे यांनी त्यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते स्व. अरविंद भुंजे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विविध देशी प्रजातीच्या झाडांची १०० रोपे वृक्षारोपणासाठी वृक्षदेवता ग्रुपला भेट दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी वृक्षदेवता ग्रुपच्या कार्याचा गौरव केला. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी प्रिया भुंजे व त्यांचे कुटुंबीय तसेच सन फार्माचे फॅसिलिटी मॅनेजर ऋतुराज आल्हाट, उमेश वाळके, नानासाहेब गायकवाड, उपसरपंच जयप्रकाश पाटील, सेवा सोसायटीचे अध्यक्ष संजय काळे, वृक्षदेवता ग्रुपच्या शोभा धामणे, शारदा भोसले, कांताबाई कडूस, शिला कडूस, राधिका कडूस, प्रा. शहाजहान तांबोळी, सतीश कडूस, दगडू कडूस, भाऊसाहेब कडूस, गणेश काळे, रणजीत ढोरजकर आदी उपस्थित होते.
भुंजे यांच्यासह उपस्थितांनी गावातील घनवन प्रकल्प, स्मशानभूमी परिसर, जलयुक्त शिवार, पाणी फाऊंडेशनच्या झालेल्या कामाची पाहणी केली. तसेच वृक्षारोपणासाठी आणखी १०० रोपे तसेच जलसंधारण आणि वृक्षसंवर्धन कामासाठी कंपनीच्या सीएसआर फंडमधून भरीव आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.
240721\4347img-20210723-wa0385.jpg
फोटो