शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

भिंगार वेशीचा भाग ढासळला

By admin | Updated: August 26, 2014 23:21 IST

भिंगार : भिंगार गावची शान असलेली, इतिहासाची साक्षीदार भिंगार वेशीचा काही भाग सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे.

भिंगार : भिंगार गावची शान असलेली, इतिहासाची साक्षीदार भिंगार वेशीचा काही भाग सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. वेशीच्या उर्वरित भागाला भेगा पडल्याने तोही भाग पडण्याच्या मार्गावर आहे. मुख्य बाजार पेठेत जाण्या-येण्यासाठी याच वेशीतून मार्ग असल्याने ही वेस धोकादायक ठरली आहे. वेस, हुतात्मा स्मारकाची नव्याने उभारणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.भिंगार गावचे वैभव असलेल्या भिंगार वेशीचा काही भाग सोमवारी झालेल्या पावसाने ढासळला आहे. अन्य भागास भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वेशीचा सदरचा भाग कधीही ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने रात्री उशिरापर्यंत वाहनांची ये-जा सुरू असते. याच वेशीत वाहतूक कोंडी वारंवार होते. वेशीजवळील साठ फूट उंचीचा वाळलेला वृक्ष कधीही उन्मळून पडण्याची भीती व्यक्त झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक भयभीत झाले आहेत. मघा नक्षत्राच्या पावसाने वादळी वाऱ्यासह शहराला झोडपल्याने डौलदार वृक्ष उन्मळून पडले आहेत. मात्र सुदैवाने त्यादरम्यान वाळलेला वृक्ष तग धरून राहिल्याने अनर्थ टळला. काही दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात त्याची एक फांदी शेजारील हनुमान मंदिराच्या छतावर पडली. पुढे पावसाळ्यात हा वृक्ष कोसळण्याचा धोका वाढला आहे. ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्य संग्रामात प्राणार्पण केले, त्याच्या स्मृती सदैव स्मरणात आहेत. त्यासाठी १८ एप्रिल १९७६ रोजी भिंगारवेशीवर स्मारकस्तंभ उभारण्यात आला होता. वेस मोडकळीस आल्याने वेस,हुतात्मा स्मारकाची नव्याने उभारणी करून वाळलेला वृक्ष त्वरित काढण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे . मंगळवारी सकाळी बाळासाहेब पतके, सुनील लालबोंद्रे,संतोष बोबडे,प्रकाश लुणिया यांच्यासह अन्य नागरिकांनी छावणीचे सीईओ विलास पवार यांना या प्रश्नी निवेदन दिले आहे. (वार्ताहर)