शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
3
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
4
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
5
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
6
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
7
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
8
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
9
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
10
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
11
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
12
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
13
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
14
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
15
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
16
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
17
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
18
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
19
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
20
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवाले बाबा दगडू लहारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST

राहुरी : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणण्यात सिंहाचा वाटा असलेले व बारागाव नांदूरसह १४ गाव पाणीपुरवठा योजनेचे ...

राहुरी : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणण्यात सिंहाचा वाटा असलेले व बारागाव नांदूरसह १४ गाव पाणीपुरवठा योजनेचे जनक दगडू नारायण लहारे (वय ९१) उर्फ पाणीवाले बाबा यांचे वृद्धापकाळाने वळण पिंपरी (ता.राहुरी) येथे निधन झाले. त्यांच्यापश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. राधेश्याम लहारे यांचे ते वडील होत.

राहुरी येथे कृषी विद्यापीठाची स्थापना व्हावी, म्हणून लहारे यांनी त्यावेळी जनजागृती केली होती. सर्वप्रथम स्वतःची जमीन विद्यापीठासाठी दिली होती. त्यानंतर, इतरांनी जमिनी दिल्या. त्यामुळे विद्यापीठ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मुळा नदीकाठी असलेल्या १४ गावांना मुळा धरणातून पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी सायकलवर फिरून त्यांनी ग्रामपंचायतींचे ठराव घेतले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व ज्येष्ठ विधिज्ञ दिवंगत राम जेठमलानी यांच्या उपस्थितीत पाणी परिषदेचे आयोजन केले होते. मुळा धरणाचे पाणी मिळाल्याशिवाय दाढी करणार नाही व पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. बारागाव नांदूर पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लागल्याने लहारे यांना पाणीवाले बाबा म्हणून संबोधले जाऊ लागले. संत गाडगे महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन लहारे यांनी गावोगावी स्वच्छता अभियान राबविले होते, तसेच तालीम व शाळा सुरू केली होती. तत्कालीन सामाजिक व न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते राहुरी भूषण पुरस्कार देऊन लहारे यांना गौरविण्यात आले होते.

........

१२ दगडू लहारे

120721\img-20210712-wa0013.jpg

ज्येष्ठ समाजसेवक पाणी वाले बाबा दगडू पाटील लहारे यांचे वृद्धापकाळाने निधन