शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरकरांची मदार एमआयडीसीच्या पाण्यावर

By admin | Updated: November 29, 2014 00:00 IST

पारनेर : पारनेर शहराला पाणीपुरवठा करणारा सोबलेवाडी येथील तलाव नोव्हेंबरमध्येच कोरडाठाक पडला आहे.

पारनेर : पारनेर शहराला पाणीपुरवठा करणारा सोबलेवाडी येथील तलाव नोव्हेंबरमध्येच कोरडाठाक पडला आहे. तर मनकर्णिका नदीजवळील विहिरीचे पाणीही संपले आहे. आता पारनेर शहराची तहान हंगा तलाव भागवत आहे. मात्र त्या हंगा तलावातही अवघा महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने जानेवारीपासून पारनेर शहरवासीयांना सुपा औद्योगिक वसाहतीकडून मिळणाऱ्या विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.पारनेर शहराची लोकसंख्या सुमारे २२ हजार आहे. पारनेर ग्रामपंचायतीच्या वतीने शहरातील अठरा व संभाजीनगर परिसरातील सहा विभागात पाणीपुरवठा केला जातो. लोकसंख्येच्या मानाने दररोज आठ लाख लीटर पाण्याची गरज आहे. सध्या हंगा तलावात पाणीसाठा उपलब्ध आहे. सुमारे पाच ते सहा किलोमीटरवरुन पाणी योजना आणल्याने या योजनेतच एक लाख लीटर पाणी वाया जाते. शिवाय पाईपलाईनमध्ये काही प्रमाणात पाणी शिल्लक राहते. गावातील पाणी साठवण टाक्या विचारात घेतल्या तर सहा ते सात लाख लीटर पाणी शहरासाठी साठविले जाते. शहरामध्ये सुमारे २६०० कुटुंब राहतात. पण त्यापैकी फक्त १३०० कुटुंबांनीच ग्रामपंचायतीचे नळ जोड घेतले आहे. सध्या तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. पण नळाला मीटर नसल्याने व नळाला तोट्या नसल्याने अनेक नागरिकही पाणी भरुन झाल्यावर रस्त्यावर पाणी सोडून देतात, असे चित्र बोळकोबा गल्ली, मुख्य शिवाजी पेठ, कोर्ट गल्ली या परिसरात पहावयास मिळते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. पारनेर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सात ते आठ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व बाहेरुन येणारे दररोज दोन तीन हजार प्रवासी यांच्यासाठीही शहराला पाण्याची गरज भासते. त्यामुळे आता हंगा तलावातील पाणीसाठा संपला की मुळा धरणातून सुपा एम.आय.डी.सी.ला होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून पारनेर ग्रामपंचायत पाणी विकत घेणार आहे़ त्यासाठी पारनेरपर्यंत पाणीपुरवठा योजना केली आहे. त्यामुळे पारनेर ग्रामपंचायतीला महिन्याला सुमारे दीड लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र, तांत्रिक बाबींचा विचार केल्यास पारनेरकरांना पाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे़(तालुका प्रतिनिधी)