पैठणकरची दर सोमवारी ‘एसीबी’च्या कार्यालयात हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST2021-02-23T04:33:04+5:302021-02-23T04:33:04+5:30

अहमदनगर : अडीच लाखांची लाच घेणारा महापालिकेतील उपआरोग्य अधिकारी नरसिंह पैठणकर याला जिल्हा न्यायालयाने २५ हजारांचा जामीन व दर ...

Paithankar visits ACB office every Monday | पैठणकरची दर सोमवारी ‘एसीबी’च्या कार्यालयात हजेरी

पैठणकरची दर सोमवारी ‘एसीबी’च्या कार्यालयात हजेरी

अहमदनगर : अडीच लाखांची लाच घेणारा महापालिकेतील उपआरोग्य अधिकारी नरसिंह पैठणकर याला जिल्हा न्यायालयाने २५ हजारांचा जामीन व दर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी या अटी व शर्तीवर सोमवारी जामीन मंजूर केला. यावेळी सरकारी पक्षाकडून ॲड. अर्जुन पवार यांनी युक्तीवाद केला.

पैठणकर याला १७ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रकल्प चालकाकडून अडीच लाखांची लाच घेताना पकडले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला जिल्हा न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पैठणकर याने न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. यावर जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्यासमोर सुनावणी झाली. दर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयाने पैठणकर याचा जामीन मंजूर केला. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हरिश खेडकर पुढील तपास करत आहेत.

Web Title: Paithankar visits ACB office every Monday