अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडावी, अशी मागणी करत डॉ़ सुजय विखे दक्षिण लोकसभेचे प्रस्तावित उमेदवार आहेत, अशी माहिती माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर येथे बुधवारी पत्रकारांना दिली. ...
बुरुडगाव भागातील काळे गल्लीमध्ये मतदारांना पैसे वाटण्याच्या संशयावरून आचारसहिंता संनियंत्रण पथकाने आज दुपारी दोघांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ३७ हजार रुपये जप्त केले आहेत. ...
विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा अजून छापखान्यातच असल्याचे उघड झाले़ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांनी तशी कबुली बुधवारी पत्रकार परिषदेत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर दिली. ...
महापालिका निवडणुकीनिमित्ताने शहरात अवैध दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे़ बुधवारी सायंकाळी महसूल व उत्पादन शुल्कच्या पथकाने दिल्लीगेट परिसरातील बागरोजा हडको येथे छापा टाकू ...
उमेदवारांची पात्रता न बघता अनेक मतदारही दारु, पैसा व भेटवस्तूंच्या आमिषाला बळी पडून मतदान करतात. अशा मतदारांचाही आता जिल्हा प्रशासनाने शोध सुरु केला आहे. ...
जळगाव व सातारा जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांमधील पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या समितीने बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळचे तर नगर जिल्ह्यात शिर्डीचे पर्यटन केले. ...