एकनाथ खडसेंवर आमचा ठाम विश्वास-विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 14:47 IST2020-09-25T14:46:29+5:302020-09-25T14:47:11+5:30
भाजपचे नेते एकनाथ खडसे हे राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत माजीमंत्री विनोद तावडे म्हणाले, भाजपचे नुकसान होईल असे काहीही नाथाभाऊ करणार नाहीत. यावर आमचा ठाम विश्वास आहे.

एकनाथ खडसेंवर आमचा ठाम विश्वास-विनोद तावडे
अहमदनगर : भाजपचे नेते एकनाथ खडसे हे राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत माजीमंत्री विनोद तावडे म्हणाले, भाजपचे नुकसान होईल असे काहीही नाथाभाऊ करणार नाहीत. यावर आमचा ठाम विश्वास आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त नगर येथे शुक्रवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर तावडे माध्यमांशी बोलत होते.
राज्यात भाजप हा एकसंघ आहे. गटबाजीचे कुठलेही वातावरण नाही. कसलेली मतभेद नाहीत. खडसे हे भाजपचे जुने जाणते नेते आहेत. ते भाजप सोडून जाणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे, असेही तावडे म्हणाले.