प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा आदेश आज निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 11:47 IST2019-06-15T11:45:33+5:302019-06-15T11:47:18+5:30

शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा बदल्यांच्या विषयाला आज पूर्णविराम मिळणार आहे.

 Orders for transfer of primary teachers will go out today | प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा आदेश आज निघणार

प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा आदेश आज निघणार

अहमदनगर : शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा बदल्यांच्या विषयाला आज पूर्णविराम मिळणार आहे. आॅनलाईन शिक्षक बदल्यांचे वारे आज थंडावणार असल्याने काहींना पसंतीची शाळा मिळाल्याने आनंद तर काहीना आॅनलाईन प्रक्रियेत दुरची शाळा मिळाल्यान निराश व्हावे लागणार आहे. आज शिक्षकांना बदलीचे आदेश मिळणार आहेत.
यावर्षी सुमारे 2500 शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन होणार असल्याने जिल्हाभर शिक्षकांना उत्सुकता लागली होतीे. आपण भरलेले २० विकल्पापैकी कोणती शाळा मिळणार आहे हे आज समजणार असून या प्रक्रियेत किती विस्थापित होणार आहेत, हेही कळणार आहे. शाळा भरण्याच्या आदल्या दिवसांपर्यंत बदल्यांचे कोणतेच आदेश प्राप्त होत नसल्याने शिक्षकांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण होते. आज बदली आदेश मिळणार असल्याचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सांगितले.

Web Title:  Orders for transfer of primary teachers will go out today