कोपरगावात ऑनलाइन चित्रकला, निबंध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST2021-05-04T04:09:47+5:302021-05-04T04:09:47+5:30
कोपरगाव : येथील कालांश राजगिरा लाडू आणि रंगकला प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे ...

कोपरगावात ऑनलाइन चित्रकला, निबंध स्पर्धा
कोपरगाव : येथील कालांश राजगिरा लाडू आणि रंगकला प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना महामारीत सगळा देश संकटात आहे आणि यावेळी प्रत्येक जण आपले विचार मांडत असून या स्पर्धेचा विषय ‘आजचा भारत’ यावर निबंध आणि चित्र तयार करून आपले मत मांडण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ही स्पर्धा विनामूल्य असणार आहे.
ही स्पर्धा कोपरगाव, नाशिक, औरंगाबाद, शिर्डी, नांदगाव आणि भंडारा या शहरांत ऑनलाइन स्वरूपात असणार आहे. स्पर्धेची अंतिम तारीख ११ मे असणार आहे. या स्पर्धेचे आयोजन कालांश उद्योगचे संचालक रोहित काले, विनय काले, मानसी काले, मनीषा काले तसेच रंगकलाचे रोहित रावकर हे आहेत. मागील वर्षात कोपरगाव शहरातून ३,७०० स्पर्धकाने सहभाग नोंदवला होता, तर १२१ परितोषिके देण्यात आली होती.