बाजार समितीच्या आवारात, कांदा गोण्यांची झाली चोरी

By शिवाजी पवार | Updated: August 24, 2023 16:41 IST2023-08-24T16:40:45+5:302023-08-24T16:41:34+5:30

याप्रकरणी सचिवांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Onion sacks were stolen from the market committee premises | बाजार समितीच्या आवारात, कांदा गोण्यांची झाली चोरी

बाजार समितीच्या आवारात, कांदा गोण्यांची झाली चोरी

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्याकडील ३१ कांदा गोण्यांची बुधवारी रात्री चोरी झाली. याप्रकरणी सचिवांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     समितीमध्ये साक्षी ट्रेडिंग कंपनीकडील मालामध्ये ३१ गोण्यांची चोरी झाली. समितीच्या आवारामध्ये अनेक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे. मात्र तरीही  )हा प्रकार घडला. त्यामुळे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. सचिव साहेबराव वाबळे यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

   आवारातील मालाच्या सुरक्षेची जबाबदारी समितीच्या प्रशासनाकडे आहे. विजय त्रिंबक छाजेड यांच्या कंपनीच्या दीड हजार गोण्या आवारात ठेवण्यात आलेल्या होत्या. त्या बाहेर विक्रीसाठी पाठविण्यात येणार होत्या. मात्र सकाळी गोण्यांची पाहणी केली असता त्यात ३१ गोण्या कमी आढळून आल्या. यानंतर सुरक्षारक्षकांना बोलावून खात्री केल्यानंतर ३५ हजार ६५० रुपयांचा माल चोरीस गेल्याचे उघड झाले. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
 

 

 

Web Title: Onion sacks were stolen from the market committee premises