नगर बाजार समितीत आवक घटली तरी कांद्याचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 11:34 IST2020-10-04T11:34:01+5:302020-10-04T11:34:57+5:30
दोन आठवड्यापूर्वी पाच हजारांच्या पुढे गेलेला कांदा पुन्हा एकदा हजार ते दीड हजार रुपयांनी घसरला. शनिवारी झालेल्या लिलावात नगर बाजार समितीत कांद्याला ३८०० रुपयांचा भाव मिळाला, तर आवकही निम्म्याने कमी झाली.

नगर बाजार समितीत आवक घटली तरी कांद्याचे भाव घसरले
अहमदनगर : दोन आठवड्यापूर्वी पाच हजारांच्या पुढे गेलेला कांदा पुन्हा एकदा हजार ते दीड हजार रुपयांनी घसरला. शनिवारी झालेल्या लिलावात नगर बाजार समितीत कांद्याला ३८०० रुपयांचा भाव मिळाला, तर आवकही निम्म्याने कमी झाली.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या कांदा लिलावात नगर बाजार समितीत या हंगामातील विक्रमी ५२०० रुपयांचा भाव कांद्याला मिळाला. शिवाय ४० हजार क्विंटल अशी मोठी आवकही झाली होती. दक्षिण भारतात सध्या मागणी वाढल्याने कांदा सर्वत्रच महागला आहे.
दरम्यान, मागील बुधवारी व शनिवारी झालेल्या कांदा लिलावात मात्र कांदा १ ते दीड हजाराने घसरला. ही घसरण या शनिवारच्या लिलावात आणखी खाली आली. शनिवार (दि. ०३) लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्यास ३१०० ते ३८०० रुपयांचा भाव मिळाला.
शनिवारच्या लिलावातील भाव असे-आवक (१९७६४ क्विंटल), प्रथम प्रतवारी ३१०० ते ३८००, द्वितीय २००० ते ३१००, तृतीय ९०० ते २०००, चतुर्थ ४०० ते ९००.