मतदानासाठी एक हजार वाहनांची आवश्यकता

By Admin | Updated: October 7, 2014 23:51 IST2014-10-07T23:35:50+5:302014-10-07T23:51:37+5:30

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बारा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाहनांची आवश्यकता असून, प्रशासकीय यंत्रणेने वाहनांची शोधाशोध सुरू केली आहे़

One thousand vehicles required for voting | मतदानासाठी एक हजार वाहनांची आवश्यकता

मतदानासाठी एक हजार वाहनांची आवश्यकता

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बारा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाहनांची आवश्यकता असून, प्रशासकीय यंत्रणेने वाहनांची शोधाशोध सुरू केली आहे़ अवघ्या आठ दिवसांत ही वाहने उपलब्ध करावी लागणार असल्याने वाहने देता का वाहने, असे म्हणण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे़
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे़ प्रचारासाठी अवघे आठ दिवस राहिले आहेत़ बारा मतदारसंघात येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येत आहे़ मतदानाची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे़ मतदानयंत्रापासून ते कर्मचारी नियुक्त करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना मतदान केंद्रांवर पोहोच करण्याची व्यवस्था करणे, अधिकाऱ्यांना स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करणे, मतदानासाठी लागणारे साहित्य पुरविणे,यासारखे नियोजन करण्यात आले आहे़ मतदानाच्या दिवशी किती वाहने लागतील, याचा आराखडा तयार झाला आहे़ त्यानुसार वाहने अधिग्रहण करण्यात येत असून, जिल्ह्यातील बारा मतदारसंघात ३ हजार ५९७ मतदान केंद्र आहेत़
मतदारसंघातील अधिकाऱ्यांकडूनच वाहनांबाबतचा आहवाल मागविला होता़ तो प्राप्त झाला आहे़ त्यानुसार बारा मतदारसंघात १ हजार ३१४ वाहनांची आवश्यकता आहे़ ही वाहने निवडणूक निरीक्षकांनी अधिग्रहण करायची आहेत, तशा सूचना संबंधित निवडणूक निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत़ मतदान केंद्रानिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची आवश्यकता असून, जिल्ह्यात कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी ४०५ बस लागतील़ अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी जीपची व्यवस्था करण्यात येणार आहे़ त्यासाठी ७९४ जीपचा शोध प्रशासनाकडून सुरू झाला आहे़ मतदानासाठीची यंत्र पोहोचविण्यासाठी ट्रक भाडेतत्वावर घेण्यात येतील़ ट्रकचा शोध कर्मचाऱ्यांनी सुरू केला असून,वाहनांसाठीची धावपळ सुरू झाली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: One thousand vehicles required for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.