नगर-दौंड रोडवर काष्टीजवळ अपघात एक जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 16:59 IST2018-01-05T16:46:11+5:302018-01-05T16:59:08+5:30
नगर-दौंड रोडवर वाळूची ट्रक व मारुती यांच्यात जोरदार धडक होऊन मारुती व्हॅनचा चालक देवीदास बापूराव बनकर (रा. माळवाडी अजनुज, वय ६५) हे जागीच ठार झाले. हा अपघात मातोश्री हॉस्पीटलसमोर गुरूवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला.

नगर-दौंड रोडवर काष्टीजवळ अपघात एक जण जागीच ठार
काष्टी : नगर-दौंड रोडवर वाळूची ट्रक व मारुती यांच्यात जोरदार धडक होऊन मारुती व्हॅनचा चालक देवीदास बापूराव बनकर (रा. माळवाडी अजनुज, वय 56) हे जागीच ठार झाले. हा अपघात मातोश्री हॉस्पीटलसमोर गुरूवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला.
देवीदास बनकर हे दौंडवरून घराकडे जात असताना एका अज्ञात वाळूच्या ट्रकने मारुती व्हॅनला समोरुन जोरदार धडक दिली़ या अपघातात देवीदास बनकर यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी माळवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
देविदास बनकर हे पुणे येथील एका खाजगी कंपनीत इलेक्टीकल इंजिनिअर म्हणून काम करत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
काष्टी गावाजवळ तीन दिवसात दोन अपघात झाले असून, यात दोघांचा बळी गेला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.