अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर काही नागरिक आपल्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंड (अँटीबॉडी) तयार झाले आहेत का, याची तपासणी करीत आहेत. कोरोनाची दुसरी लाट तीव्र असताना दिवसाला पाच ते दहा जणांची तपासणी केली जायची. सध्या मात्र दिवसाला एखादाच अशी तपासणी करीत असल्याचे दिसून आले आहे.
कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात काही प्रमाणात कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यास अँटीबॉडीज तयार होतात. याशिवाय लसीकरणाच्या दोन्ही डोसनंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. हे एक प्रकारचे कवच आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व नियमांचे पालन करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे, तर तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. यामध्ये ज्या नागरिकांना संसर्ग झालेला नाही, अशा व्यक्तींद्वारा त्यांना कोरोना तर होऊन गेलेला नाही, या शंकेने अँटीबॉडीजची तपासणी केली जात होती. नगर शहरातील खासगी पॅथॉलॉजीमध्ये मागील काही दिवसांपासून अशा प्रकारच्या तपासणीसाठी नागरिकांचा कल दिसून आला. प्रत्येक नागरिकांनी अशा प्रकारच्या चाचण्यांची काहीच आवश्यकता नसते. लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यास यामध्ये गंभीर होण्याची शक्यता कमी आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
-------------
लसीकरण पहिला डोस - ०००
दुसरा डोस - ०००
उद्दिष्टाच्या तुलनेत प्रमाण - ७ टक्के
------------
अँटीबॉडीज तपासणीच्या प्रमाण घटले
शहरात अँटीबॉडी तपासणीच्या प्रमाणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात वाढ झाली होती. येथील काही खागसी प्रयोगशाळांच्या तज्ज्ञांनीच ही माहिती दिली. काही लोक उत्सुकता म्हणून तर काहींना डॉक्टरांनी सांगितले म्हणून अँटीबाॅडीज तपासणीसाठी येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
-------
तरुणाईसह ज्येष्ठांनाही उत्सुकता
लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांत शरीरातील अँटीबॉडीज वाढतात. त्यामुळे अशा प्रकारच्या तपासण्यांची काहीच आवश्यकता नाही. काही जण तर केवळ उत्सुकतेपोटी या चाचण्या करीत होते. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही आढळून यायचे. लसीकरणानंतर संसर्ग जरी झाला तरी गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------
तपासण्याची खरेच गरज आहे का?
कोरोना होऊन गेला काय किंवा झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडी तयार झाल्यात का यासाठी ऑन्टीबॉडी तपासणी करण्यात येते. लसीकरणानंतर संसर्ग झाला तरी त्याचा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. कोरोना झाल्यानंतर किंवा लसीकरणानंतर प्रत्येकाच्या शरीरात कमी-अधिक प्रमाणात ऑन्टीबॉडी तयार होत असतात. त्याची तपासणी केली पाहिजे, असे काहीच नाही. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करावे.
- डॉ. सतीश राजूरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका
----------