एक लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 14:15 IST2020-11-29T14:15:11+5:302020-11-29T14:15:40+5:30

बंदी असूनही गुटखा व पानमसाल्याचा साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. संजय बाबुलाल लुकंड (वय ४५, अभंग मळा, संगमनेर) असे संशयिताचे नाव आहे.

One lakh gutkha, Panamsala seized | एक लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त, एकास अटक

एक लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त, एकास अटक

संगमनेर : बंदी असूनही गुटखा व पानमसाल्याचा साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. संजय बाबुलाल लुकंड (वय ४५, अभंग मळा, संगमनेर) असे संशयिताचे नाव आहे.

      पोलिसांनी अवैध गुटखा विक्री विरोधात मोहीम हाती घेतली आहे. लुकंड यांनी राहत्या घराच्या शेजारील गुदामात मोठया प्रमाणात गुटखा व पानमसाला साठवणूक केल्याची खबर पोलिसांना मिळाली. शनिवारी (दि.२८) पोलिसांनी दुपारी या गुदामावर छापा टाकला. त्यावेळी या ठिकाणी मोठया प्रमाणात गुटखा व पानमसाला आढळला.

     पोलिसांनी हा साठा जप्त केला असून त्याची किमंत एक लाखांपेक्षा जादा आहे. बंदी असूनही अवैधरित्या गुटखा साठवल्याप्रकरणी पोलिसांनी संजय लुकंड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. मागील पंधरा दिवसातील ऐवढया मोठ्या प्रमाणात गुटखा जप्तिची ही दुसरी कारवाई आहे. पोलिसांच्या या कारवाईने अवैधरित्या गुटखा विकणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: One lakh gutkha, Panamsala seized