एसटी व दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 15:29 IST2020-11-22T15:28:52+5:302020-11-22T15:29:38+5:30
नगर रोडवरील निकाळजेवस्ती येथे एस.टी .बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

एसटी व दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक जखमी
शेवगाव : नगर रोडवरील निकाळजेवस्ती येथे एस.टी .बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सकाळी साडेअकारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. संजय नाथा कदम (वय ४८ रा. मंगरूळ, ता. शेवगाव ) हे जागीच मृत्युमुखी पडले तर निवृत्ती होना भांगरे हे जखमी झाले असून त्यांना शेवगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अमोल संजय कदम यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मयत हे ढोरजळगाव येथील श्रीराम विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. तर जखमी हे कांबी हायस्कूल येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. संजय कदम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. |