नेवासा फाटा येथील दुभाजकाला कार धडकून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:16+5:302021-02-06T04:36:16+5:30
नेवासा फाटा : नगर- औरंगाबाद राज्य महामार्गावर नेवासा फाटा येथील राजश्री शाहू बँकेजवळ असलेल्या दुभाजकाला कार धडकून एक जण ...

नेवासा फाटा येथील दुभाजकाला कार धडकून एक ठार
नेवासा फाटा : नगर- औरंगाबाद राज्य महामार्गावर नेवासा फाटा येथील राजश्री शाहू बँकेजवळ असलेल्या दुभाजकाला कार धडकून एक जण ठार झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. कार (क्र. एमएच-४० सीए-१७२५) मधील प्रवासी हे मुंबई येथून नागपूरकडे निघाले होते. मात्र, नेवासा फाटा येथील शाहू बँकेजवळ असलेल्या दुभाजकाचा कारचालकाला अंदाज न आल्याने ती दुभाजकावर जाऊन आदळली. कारमधील धनंजय गावंडे (वय ५०) ही व्यक्ती जागीच ठार झाली. ही धडक इतकी भीषण होती की, सदर दुभाजकावरील पोल दुभाजकासह उखडून दुसऱ्या बाजूला फेकला जाऊन कारही तेथून १०० फुटांपर्यंत घसरत जाऊन थांबली. इतर तीन जण एअर बॅग उघडल्याने बचावले. गणेश निमसे, सनी सचदेव, पप्पू निमसे, अवधूत मिरकुटे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. पुढील तपास पोना. बबन तमनर करत आहेत.