मोटारसायकल अपघातात शिक्षकासह दोन जखमी; जामखेड तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 13:39 IST2020-05-24T13:35:49+5:302020-05-24T13:39:20+5:30
दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अकोले तालुक्यातील एका शिक्षकासह त्याच्या भाऊ जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजता जामखेड तालुक्यातील रत्नापूर फाटा येथे घडली.

मोटारसायकल अपघातात शिक्षकासह दोन जखमी; जामखेड तालुक्यातील घटना
जामखेड : दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अकोले तालुक्यातील एका शिक्षकासह त्याच्या भाऊ जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजता जामखेड तालुक्यातील रत्नापूर फाटा येथे घडली.
रामदास मारुती पिचड (वय ४४ रा. अकोला जि. अहमदनगर) हे तालुक्यातील दिघोळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे येथून लोक गावी येत असल्याने त्यांना शाळेत क्वारंटाईन केले जात आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक गावात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची नियुक्ती केली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शिक्षक रामदास पिचड गावी अकोले येथे होते. क्वारंटाईन झालेल्या शाळेत रामदास पिचड यांची ड्युटी लागल्यामुळे ते सख्खा भाऊ भरत पांडुरंग पिचड (वय ४७, रा.अकोला, जि.अहमदनगर) यास अकोला येथून मोटरसायकलवरून जामखेड येथे येत होते. यावेळी जामखेड तालुक्यातील रत्नापूर फाट्याजवळ एका मोटरसायकलने समोरासमोर धडक दिली. यामध्ये झालेल्या अपघातात पिचड बंधू जखमी झाले आहेत. जखमींना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यांची प्रकृती सुधारत आहे.