अशोक कारखान्याचे शंभर बेड्सचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST2021-05-04T04:09:39+5:302021-05-04T04:09:39+5:30
श्रीरामपूर : अशोक साखर कारखान्याच्या वतीने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकनगर येथील पॉलिटेक्निक कॉलेजच्या वसतिगृहामध्ये शंभर बेडचे ...

अशोक कारखान्याचे शंभर बेड्सचे
श्रीरामपूर : अशोक साखर कारखान्याच्या वतीने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकनगर येथील पॉलिटेक्निक कॉलेजच्या वसतिगृहामध्ये शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले.
प्रांताधिकारी अनिल पवार यांचे हस्ते तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, डॉ. रवींद्र कुटे यांच्या उपस्थितीत कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. एचआरसीटी स्कोअर आठच्या आतील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथे मोफत उपचार केले जाणार आहेत. सकाळी व सायंकाळी दोन वेळेस चहा, सकाळी नाष्टा आणि दोन वेळचे जेवण अशोक कारखान्याच्या वतीने मोफत पुरविले जाणार आहे. तसेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा या काेविड सेंटरमध्ये उपलब्ध होऊ शकली नाही, अशी माहिती अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ यांनी दिली.
कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी सोबत एचआरसीटी स्कोअर प्रमाणपत्र, आधारकार्ड, जेवणासाठी ताट, वाटी, ग्लास व पांघरून आणावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष पोपटराव जाधव, माजी अध्यक्ष सोपान राऊत, माजी सभापती प्रा. सुनीता गायकवाड, रोहन डावखर, नीरज मुरकुटे, व्यापारी असोसिएशनचे संचालक अमोल कोलते, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश उंडे, डॉ. वैभव उंडे, डॉ. कल्याणी झाडे, डॉ. शामल उंडे, कार्यालय अधीक्षक आप्पासाहेब दुशिंग, नीलेश गाडे, कृष्णकांत सोनटक्के, अण्णासाहेब वाकडे, रमेश आढाव, विलास लबडे, माया बारसे, कोमल दोंदे, अंकुश सातुरे, कोमल सातुरे आदी उपस्थित होते.