दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 13:13 IST2020-12-04T13:12:32+5:302020-12-04T13:13:18+5:30
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे दुचाकीवरून खाली उतरत असताना बेवारस जनावरांचा धक्का लागून डांबरी रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून एकाचा मृत्यू झाला.

दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे दुचाकीवरून खाली उतरत असताना बेवारस जनावरांचा धक्का लागून डांबरी रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून एकाचा मृत्यू झाला.
जयराम गणपत दिघे ( वय ५५ वर्षे रा. तळेगाव दिघे ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी ( दि. २ ) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तळेगाव दिघे ( जुनेगाव ) येथील जयराम गणपत दिघे हे एका व्यक्तीच्या दुचाकीवरून कोपरगाव रस्त्याने गावाकडे येत होते.
जुनेगावच्या छत्रपती संभाजी चौकानजीक ते दुचाकीवरून खाली उतरत असताना गावातील बेवारस जनावरांचा त्यांना धक्का लागून ते डांबरी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर जयराम दिघे यांना तातडीने संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा मृतदेह घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जयराम दिघे यांना मृत घोषित केले.