सहा गावठी कट्ट्यासह एकास अटक, १ लाख ५६ हजारांचा ऐवज हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 15:49 IST2023-03-27T15:48:22+5:302023-03-27T15:49:06+5:30
गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले.

सहा गावठी कट्ट्यासह एकास अटक, १ लाख ५६ हजारांचा ऐवज हस्तगत
अण्णा नवथर
अहमदनगर: श्रीरामपूर येथून चार गावठी कट्टे पकडल्याची घटना ताजी असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा तालुक्यातून सहा गावठी कट्ट्यासह एकास अटक केली आहे. आरोपीकडून एकूण १ लाख ५६ हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
कयामुद्दीन कुतूबद्दीन शेख ( ३४, रा. कुकाणा, ता. नेवासा ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव चांदा रस्त्यावर एक इसम गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन येणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सहा गावठी कट्टे व १२ जीवंत काडतूसे ताब्यात घेतले आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. हे गावठी कट्टे आरोपीने मध्यप्रदेशातून आणले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.