विसापुरात भरदिवसा दीड लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 16:54 IST2020-06-24T16:53:39+5:302020-06-24T16:54:13+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे शिंदेमळा शिवारात मंगळवारी (२३ जून) रोजी दुपारी पोपट सर्जेराव कराळे यांच्या घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याची दागिने असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबवला आहे.

One and a half lakh burglary in Visapur every day | विसापुरात भरदिवसा दीड लाखांची घरफोडी

विसापुरात भरदिवसा दीड लाखांची घरफोडी

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे शिंदेमळा शिवारात मंगळवारी (२३ जून) रोजी दुपारी पोपट सर्जेराव कराळे यांच्या घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याची दागिने असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबवला आहे.

मंगळवारी पोपट कराळे विसापूर गावात गेले होते. त्यांच्या पत्नी नंदा पोपट कराळे घराचा दरवाजा लोटून शेजारी शेतात गेल्या होत्या. त्यावेळी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. 

घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे गंठण, वेल, बदाम, नथ असे सुमारे अडीच तोळे वजनाचे दागिने व रोख ३० हजार रुपये असा सुमारे दीड लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. 

Web Title: One and a half lakh burglary in Visapur every day