शासकीय अधिकारी व कर्मचारी हे काम करीत असताना वैयक्तिक लाेभ टाळून समाजाच्या हितासाठी काम करीत असतात. कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी अत्यंत कर्तव्यनिष्ठ काम करीत आहे. तसेच त्यांच्यावर कोरोनाचा अतिरिक्त कामाचा ताण आहे. त्यांना अशा पद्धतीने नगरसेवक व कार्यकर्ते यांच्याकडून शिवीगाळ व मारहाण अभिप्रेत नाही. अशा परिस्थितीत राज्य संवर्गातील अधिकारी व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे बाबत अनास्था तयार झाली आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनील गोर्डे, दिगंबर वाघ, पल्लवी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर चाकणे, रोहित सोनवणे, बालचंद्र उंबरजे, तुषार नालकर, नितेश मिरीकर, दीपक बडगुजर, प्रमोद ढोरजकर, सोमनाथ नारळकर, अरुण तोगे, सुमित काळोखे, महेश काकडे, ज्ञानेश्वर जगताप, श्वेता शिंदे, ऋतुजा पाटील, बी. एम. पारधी यांच्या सह्या आहेत.
.......
फोटो२४ - जिल्हाधिकारी निवेदन - कोपरगाव