नगरमध्ये विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:58+5:302021-08-19T04:25:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सावेडीसह बोल्हेगाव परिसरात विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे शहरासह उपनगरांत औषध फवारणीसह अन्य ...

नगरमध्ये विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : सावेडीसह बोल्हेगाव परिसरात विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे शहरासह उपनगरांत औषध फवारणीसह अन्य उपाययोजना सुरू कराव्यात, अशा सूचना आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या जुन्या इमारतीत बैठक झाली. बैठकीला आरोग्य अधिकारी डॉ. सतीष राजूरकर, समितीचे सदस्य सचिन जाधव, निखिल वारे आदी उपस्थित होते.
शहरासह उपनगरांत डेंग्यूचे २२ संशयित रुग्ण आढळून आले होते. यापैकी ५ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे तपासणीतून समोर आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. विषाणूजन्य अजाराचे रुग्ण वाढत असल्याने शहरासह उपनगरांत औषध फवारणी करण्याच्या सूचना सदस्यांनी केल्या. तसेच या आजारांबाबत महापालिकेने जनजागृतीची मोहीम सुरू करावी. डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. डास स्वच्छ पाण्यात तयार होतो. कुंड्यांमधील पाणी काढून टाकणे, साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडावेत. पाणी दररोज उकळून प्यावे, असे आवाहन सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
...
काेरोना मिशन झिरोसाठी उपाययोजना
कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असली तरी रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीची तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवावे. तसेच लसीकरण वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. महापालिकेने शहरात कोरोना मिशन 'झिरो' राबविण्याचे बैठकीत ठरले.
...
सूचना : फोटो १८ महापालिका