अनधिकृत प्रयोगशाळा चालकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:50+5:302021-08-12T04:25:50+5:30

तिसगाव : तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सुचनेनुसार तिसगाव (ता. पाथर्डी) प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत कार्यरत असलेल्या सहा अनधिकृत प्रयोगशाळा ...

Notice to unauthorized laboratory operators | अनधिकृत प्रयोगशाळा चालकांना नोटीस

अनधिकृत प्रयोगशाळा चालकांना नोटीस

तिसगाव : तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सुचनेनुसार तिसगाव (ता. पाथर्डी) प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत कार्यरत असलेल्या सहा अनधिकृत प्रयोगशाळा चालकांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. पॅरावैद्यक परिषदेचे नोंदणीपत्र अतितत्काळ सादर करा. नोंदणीपत्र नसताना खासगी प्रयोगशाळा सुरू असल्याचे आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा इशाराच या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने नोटीस बजावल्यानंतर अनधिकृत प्रयोगशाळांकडून रुग्णांना देण्यात येणारा तपासणी अहवाल आता साध्या कागदांवर किंवा थेट संबंधित डॉक्टरांच्या मोबाईलवर कळविला जात असल्याचे चित्र आहे. पॅरावैद्यक नोंदणीसाठी आवश्यक असलेले स्थानिक ग्रामपंचायत, नगर परिषदेचा परवाना, वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट पारपत्र या अनधिकृत प्रयोगशाळा चालकांकडे नसल्याची बाब वैद्यकीय सर्वेक्षणाअंती समोर येत आहे. महामारीच्या काळात खासगी प्रयोगशाळांत अनेक रुग्ण तपासणी करीत असत. लोकमतने याबाबत अनेकदा आवाज उठविला आहे. त्यामुळे खासगी प्रयोगशाळा व त्यांच्या चालकांना अभय देऊ नका, थेट कारवाईच करा, असे लेखी निवेदन शिवसेना महिला आघाडी संघटक सविता ससे यांनी पाथर्डी तहसीलदारांना दिले आहे. कारवाई न झाल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

...................

पॅरावैद्यक परिषदेची नोंदणी नसलेल्या अनधिकृत सहा खासगी प्रयोगशाळांना नोटीस बजावल्या आहेत. नोंदणी नसताना, नोटीस बजावूनही प्रयोगशाळा सुरू असल्याचे आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील.

-डॉ. बाबासाहेब होडशीळ, आरोग्य अधिकारी

Web Title: Notice to unauthorized laboratory operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.